Tuesday, May 5, 2020

Dailyhunt App

*Dailyhunt - डेलीहंट*

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला Dailyhunt ॲप बद्दल माहिती देणार आहे.

*डेलीहंट* हे एक न्यूज, एंटरटेनमेंट आणि व्हिडिओज ॲप आहे. यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी व इतर बऱ्याच भाषेमध्ये बातम्या, व्हिडिओज आणि वायरल मेसेजेस आपल्याला पाहता येतात.
 तसेच देशादेशातील बातम्या, मनोरंजन, राजकारण, खेळ, व्यवसाय, वायरल मेसेजेस, शेअर बाजार याबाबतच्या बातम्यां आणि व्हिडिओचा या ॲप मधून आपण आनंद घेऊ शकता.
या ॲप मध्ये नवनवीन बातम्या प्रत्येक मिनिटाला अपडेट होत असतात.
तसेच एखाद्या आपल्या आवडीच्या क्षेत्राला तेथे आपण फॉलो करून त्याबद्दलची अपडेट न्यूज आपल्याला आपल्या होम स्क्रीन वरती पाहता येते व आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकते.
या ॲपची एक खुबी म्हणजे आपल्याला यामध्ये जीवनशैली, आरोग्य, सौंदर्य, त्याचबरोबर वेगवेगळ्या चवदार पाककृती याबद्दल आपल्याला टिप्सही मिळतात.
यामध्ये दैनिक ज्योतिष बघता येते. ज्योतिष शास्त्र मधून आपण ग्रह-तारे याबद्दल जाणून घेऊ शकतो. त्याचबरोबर प्रख्यात तज्ञांकडून ज्योतिष, करियर, आरोग्य, संपत्ती आणि बरेच काही, याबाबत आपण आपली पत्रिका मिळू शकतो.
आपल्याला यामधून स्थानिक वृत्तपत्र ही वाचायला मिळतात तसेच व्हिडीओ  चित्रीकरणही पाहता येते.
आपल्या जिल्ह्यात घडत असलेल्या स्थानिक बातम्याही आपण त्यामध्ये अपडेटेड पाहू शकता.
 त्याचबरोबर या सर्व प्रकारच्या बातम्या, वायरल मेसेजेस व इतर गोष्टी आपण व्हाट्सअप, फेसबूक व इतर कोणत्याही माध्यमातून दुसऱ्यांना शेअर करू शकता.

१.सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून Dailyhunt हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे. 
https://play.google.com/store/apps/details?id=com.eterno

२. ॲप ओपन केल्यावर आपल्याला होम स्क्रीन दिसेल.

३. होम स्क्रीनच्या वरती डाव्या कोपऱ्यात ऑप्शन बार आहे. यामधून आपल्याला साइन-इन चा ऑप्शन मिळेल आपल्याला गरज वाटल्यास आपण तेथे साइन इन करू शकतो.

४. होम स्क्रीन वरती आपल्याला वेगवेगळ्या अपडेटेड बातम्या तसेच व्हिडिओज पाहता येतात.

५. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील  पेजेसही आपण बघू शकतो तसेच या पेजेस ना आपण फॉलो करून त्याबद्दलची अपडेटेड लेटेस्ट न्युज पाहू शकतो.

धन्यवाद.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs