Friday, May 1, 2020

Canva App

*Canva - कॅनव्हा*

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला Canva ॲप बद्दल माहिती देणार आहे.

कॅनव्हा ॲप मधून खूप सोप्या पद्धतीने आकर्षक डिझाईन तसेच व्हिडिओ ही तयार करता येतात. आता हे डिझाईन व व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण त्यातले तज्ञ असणे गरजेचे नाही.  तसेच या ॲप मधून आपण आपले फोटो आणि व्हिडिओंसह जबरदस्त डिझाइन तयार करता येतात.

 कॅनव्हा हा एक  ग्राफिक डिझाइन ॲप आहे. यामधून आपण लोगो, पोस्टर , व्हिडिओ तयार करतो. तसेच इन्स्टाग्राम हायलाइट कव्हर, इंस्टाग्राम स्टोरी त्याचबरोबर पोस्ट डिझाइन करण्यासाठी फेसबुक, Pinterest and Twitter, सारख्या सोशल नेटवर्क्ससाठी बॅनर तयार करण्यासाठी वापरले जाते. आणि अगदी  वाढदिवसाची आमंत्रणे किंवा लग्नाची आमंत्रणे यामधून आपण बनवू शकतो.   आपण तयार केलेली सर्व डिझाईन आपल्या फोन मध्ये राहतात. जेणेकरून आपण कधीही, कोठेही आपल्या डिझाइनमध्ये परत जाऊ शकतो व पुन्हा एडिट करू शकतो.


१.सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून Canva हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे. 
https://play.google.com/store/apps/details?id=com.canva.editor

२. ॲप ओपन केल्यावर आपल्याला देते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डिझाईन उपलब्ध दिसतील.

३. त्यापैकी आपल्या आवडलेली डिझाईन आपण सिलेक्ट करून त्यामध्ये आपल्याला हवं तसं एडिट करू शकतो.

४. त्याचबरोबर मुखपृष्ठाच्या खाली उजव्या बाजूला प्लस चिन्हावर क्लिक करून स्वतःची डिझाईन तयार करू शकतो.

धन्यवाद.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs