*Mahavitaran–* *महावितरण*
नमस्कार मित्रांनो,
आज मी आपल्याला महावितरण या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
MSEDCLया विद्युत वितरक कंपनीने ग्राहकांना त्यांचे विज बिल व इतर सेवा सुविधांसाठी हे ॲप बनवले आहे.
या ॲप मधून आपण आपले विद्युत बिल अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या भरू शकतो.
तसेच एखाद्या विद्युत विजेबाबत काही तक्रार असल्यास आपण काही सेकंदातच आपली तक्रार ऑनलाईन नोंदवु शकतो. त्याचबरोबर आपण या ॲप मध्ये इतर कोणाचेही कनेक्शन ऍड करून त्यांचे बिल पेमेंट करू शकतो.
तसेच बिल कॅल्क्युलेट करण्यासाठी तेथे बिल कॅल्क्युलेटर आहे. त्याचबरोबर चोरीबाबत तक्रार नोंदवू शकतो, आपल्या विज बिलाबाबत आपले नाव बदलण्याबाबत तेथे एप्लीकेशन करू शकतो, आपला विद्युत लोड चेंज करायचा असल्यास त्या संदर्भातही आपण ॲप्लिकेशन करू शकतो, अशा बऱ्याच सुविधा आपल्याला या ॲप मधून मिळतात.
तर चला पाहूया यामधून आपण कशाप्रकारे आपले वीज बिल भरू शकतो.
१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून महावितरण हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
२.त्यानंतर महावितरण ॲप ओपन केल्यावर आपल्याला होम स्क्रीन ला वेगवेगळे टॅब दिसतील.
३.त्यामध्ये ऍड कनेक्शन या ऑप्शन मध्ये जावे.
४.तेथे आपला ग्राहक क्रमांक विचारला जाईल. तो तेथे टाईप करून ऍड बटनावर क्लिक करावे. ग्राहक क्रमांक हा आपल्याला आपल्या जुन्या वीज बिलावर मिळेल.
५.त्यानंतर फक्त ग्राहक क्रमांक टाकून लगेचच आपले कनेक्शन तेथे ऍड होईल.
६. तेथे ग्राहक क्रमांका वरून आपल्याला तेथे आपली माहिती पहायला मिळेल.
७.आता आपण होम स्क्रीन वरती यावे. होम स्क्रीन वरती पे बिल या ऑप्शनमध्ये जावे.
८. त्यामध्ये आपल्याला आपले नाव व ग्राहक क्रमांक तेथे दिसेल.
९. तेथे आपल्या नावावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो दिसेल तेथे आपल्या विद्युत बिलाबाबतची सर्व माहिती आपल्याला पाहता येईल.
१०. माहितीच्याखाली आपल्याला पे बिलाचा ऑप्शन मिळेल, तेथे क्लिक करावे.
११.त्यानंतर महावितरण कंपनीच्या काही ऑनलाइन पेमेंट बाबत कंडिशन्स आपल्याला तेथे Agree (सहमत) करावे लागतील.
१२.त्यानंतर आपल्याला तेथे Nimo व Paytm असे दोन पेमेंट गेटवे दिसतील त्या दोन्हीपैकी कोणत्याही एका पेमेंट गेटवे चा वापर करून आपण आपल्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग तसेच यूपीआय पर्यायचा वापर करून आपले बिल भरू शकतो.
अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या आपले विद्युत बिल भरू शकतो.
त्याचबरोबर आपण त्यामध्ये असलेल्या इतर सेवा सुविधांचाही लाभ घेऊ शकतो.







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs