Saturday, May 2, 2020

Google Meet Online Classroom App

*Google Meet आता सर्वांसाठी मोफत, कसं करायचं रजिस्ट्रेशन?* 

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता Google नेही आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलंय. आतापर्यंत हे अ‍ॅप केवळ G Suite च्या ग्राहकांसाठी उपलब्ध होतं. त्यासाठीही पैसे आकारले जायचे. पण आता हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असेल.

 *काय आहे खासियत आणि कसं करायचं रजिस्ट्रेशन?*

या अ‍ॅपची खासियत म्हणजे याद्वारे एकाचवेळी तब्बल 250 जणांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येणे शक्य आहे.
आतापर्यंत हे अ‍ॅप G Suite च्या माध्यमातून केवळ व्यावसायिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध होते.
पण, २९ एप्रिलपासून पहिल्यांदाच हे Google Meet हे अ‍ॅप गुगल अकाउंट असलेल्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे.
टप्प्याटप्प्यात याची सुरूवात झाली असून काही आठवड्यांमध्ये देशभरात ‘फ्री’ फीचर रोलआउट केले जाईल.
गुगलने यासाठी एक ‘नोटिफाय मी’ पेज तयार केले आहे.
https://landing.google.com/googlemeet/ या पेजवर आपली माहिती शेअर केल्यानंतर तुम्हाला कधीपर्यंत Google Meet ची सेवा मिळेल याबाबत सूचना मिळेल.
वेब अ‍ॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पण, ही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर मिटिंगची वेळमर्यादा ६० मिनिटांपर्यंत सेट केली जाईल.
G Suite Essentials मध्ये मिळणारे डायल-इन फोन नंबर, मिटिंग रेकॉर्डिंगसारखे सर्व फीचर्स युजर्ससाठी 30 सप्टेंबरपर्यंत मोफत असणार आहेत.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs