*DigiLocker - a simple and secure document wallet*
नमस्कार मित्रांनो,
DigiLocker हे डिजिटल इंडिया अंतर्गत महत्त्वाचे ॲप आहे.
या ॲपच्या मदतीने आपण आपले महत्वाचे, तसेच इतर कागदपत्र ऑनलाइन पाहू शकतो तसेच सेव्ह ठेवू शकतो.
त्याचबरोबर आपली कागदपत्रे तसेच आपण सेव्ह ठेवलेली इतर कागदपत्रे या ॲपच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षित राहतात.
डिजिलॉकर ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे. ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे.
आपण आपले वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसार, तेथून थेट आपल्याला आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना इत्यादी. या ॲपच्या मदतीने आपण आपली कागदपत्रे थेट संगणकावर/मोबाईल फोन वरती डाऊनलोड करू शकतो,
या ॲपच्या मदतीने आपल्याला आपले अनेक दस्तऐवज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.
१.सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून DigiLocker हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android
२. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन केल्यावर आपल्याला होम स्क्रीन दिसेल.
३. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला डिजिलॉकर ॲप मध्ये आपले एक अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी होम स्क्रीनच्यावरती उजव्या कोपऱ्यात SIGN IN ऑप्शन आहे.
४. SIGN IN ऑप्शनवर क्लिक केल्यावर तेथे आपल्याला नवीन अकाउंट ओपन करण्याचा पर्याय दिसेल.
५.त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपला आधार नंबर तिथे द्यावा लागेल.
६. आधार नंबर टाईप केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
७. त्यानंतर व्हेरिफिकेशन साठी आपल्याला ओटीपी कोड मागितला जाईल. ओटीपी कोड आपल्याला आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबर वरती प्राप्त होईल.
८. प्राप्त झालेला ओटीपी कोड आपण तेथे टाकावा व सबमिट करावे.
९. त्यानंतर आपल्या आधार कार्ड नुसार असलेल्या माहितीनुसार आपले अकाऊंट ऑटोमॅटिकली तयार होईल.
तेथे आपल्याला आपले नाव वगैरे इतर माहिती भरण्याची आवश्यकता नाही.
१०. यानंतर आपल्याला आपले अकाउंट सुरक्षित राहण्यासाठी सहा डिजिटचा नंबर स्वरूपात कोड टाकण्यास येईल. तो तेथे आपण इंटर करावा.
११. आता आपले अकाऊंट यशस्वीरीत्या पूर्ण झाले. त्याचबरोबर तेथे आपण आपले आधार कार्ड सुद्धा पाहू शकता.
१२. आता होम स्क्रीन वरती दाखवलेल्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सच्या प्रकारानुसार तेथे ठराविक माहिती भरून आपण आपले डॉक्युमेंट्स तेथे पाहू शकतो.
धन्यवाद.







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs