*Gboard - the google keyboard* जीबोर्ड
नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला Gboard या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
जीबोर्ड हे एक प्रकारचे मोबाईल मध्ये टायपिंग करण्याचे ॲप आहे. या मधून आपण कोणत्याही भाषेमध्ये खूप जलद आणि सोप्या पद्धतीने मोबाईल मध्ये टायपिंग करू शकतो. तसेच आपण स्मार्ट फोन वर व्हॉइस टायपिंग करण्यासाठी या ॲप वापर करू शकतो.
१. नवीन स्मार्टफोन मध्ये Gboard हे ॲप आधीच उपलब्ध असते. जर हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर प्ले स्टोर ला जाऊन हे ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा.
२. त्यानंतर मोबाईल मध्ये टायपिंग करताना Gboard हे ॲप वापरण्यासाठी सर्व प्रथम Gboard हे ॲप डिफॉल्ट सेट करून घ्यावे. त्यासाठी मोबाईलच्या सेटिंग ऑप्शन मधून language and input या पर्यायामध्ये तूम्ही Gboard डिफॉल्ट सेट करून घ्या. तसेच तुमच्या सध्याच्या कीबोर्ड मधून सुध्या तुम्ही Gboard डिफॉल्ट सेट करू शकता.
३. सुरवातीस आपल्याला तिथे इंग्लिश भाषेमध्ये कीबोर्ड दिसेल. त्यातुन आपण खूप सोप्या रीतीने इंग्लिश टायपिंग करू शकतो.
४. आता यामध्ये आपण मराठी किंवा इतर भाषेचा कीबोर्ड ऍड करूया. त्यासाठी Spacebar बटण दाबून धरा. त्यात तुम्हाला "Change Keyboard" असा पर्याय दिसेल. तिथून Languge and Setting पर्याय निवडा. आता ADD KEYBOARD या बटनावर क्लिक करा आणि मराठी किंवा इतर भाषेचा कीबोर्ड ऍड करा.
५. आता तुमच्या कीबोर्ड मध्ये मराठी भाषा ऍड झालेली दिसेल. त्यामधून आपण मराठी टायपिंग करू शकतो तसेच मराठी मध्ये व्हॉईस टायपिंग देखील करू शकतो.
६. आता व्हॉईस टायपिंग करण्यासाठी कीबोर्ड च्या उजव्या कोपऱ्यातील mice च्या आयकॉन वर क्लिक करा व स्पष्ट व मोठ्या आवाजात बोला, जेणेकरून तुम्हाला अचूक टेक्स्ट मिळेल. टायपिंग पूर्ण झाल्यावर परत mice च्या आयकॉन वर क्लिक करून व्हॉइस टायपिंग बंद करा. व्हॉइस टायपिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात बदलही करू शकता.
*अशा पद्धतीने मोठे मजकुर टाईप करण्यापेक्षा तुम्ही व्हॉइस टायपिंग चा वापर करून कमी वेळात टाईप करू शकता.*
हे सर्व मी Gboard वापरूनच पाठवतोय बरं का
धन्यवाद.
उद्या नवीन ॲप सहित पुन्हा भेटू.







0 Comments:
Post a Comment
Please Comment This Blogs