Wednesday, April 22, 2020

To Do List टू डू लिस्ट


To Do List टू डू लिस्ट 


नमस्कार मित्रांनो,

आज मी आपल्याला To Do List या ॲप बद्दल माहिती देणार आहे.

टु डू लिस्ट या ॲप मधून आपण आपले रोजचे दैनंदिन कामकाज व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकतो.
काहीवेळेस एखादे इम्पॉर्टंट काम किंवा आपल्या ऑफिस मधील मीटिंग अन्यथा इतर महत्त्वाचे काम काही वेळेस आपण विसरतो. तसेच ते करायचे राहून जाते. तर टु डू लिस्ट या ॲपमध्ये आपल्याला कोणते काम कोणत्या वेळेत करायचे आहे तसेच त्याचा रिमाइंडरही लावून ठेवू शकतो. तसेच ते काम पूर्ण झाल्याबद्दल कम्प्लीट असा रिमार्कही तेथे देऊ शकतो.
त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एखादे काम दुसऱ्याला करायला द्यायचे असल्यास ते आपण दुसऱ्याशी व्हाट्सअप किंवा इतर मेसेजच्या माध्यमातून दुसऱ्यालाही पाठवू शकतो.
चला तर मग पाहूया कशाप्रकारे आपण आपल्या रोजच्या कामकाजाचे व्यवस्थित रित्या नियोजन तसेच ते पूर्ण करू शकतो.

१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून टुडू लिस्ट हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.splendapps.splendo


२.ॲप ओपन केल्यावर आपल्याला मुखपृष्ठावर खाली उजव्या कोपऱ्यात प्लस चिन्ह दिसेल.

३. त्यावर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपण आपल्या कामासंबंधी माहिती तेथे टाईप करावी.

४. तसेच ते काम कोणत्या वेळी करायचे आहे त्याची आपण तारीख व वेळ सेट करून रिमाइंडर लाऊन ठेवू शकतो.

५.त्याचबरोबर तो रिमाइंडर आपल्याला पुन्हा इतर दिवशी हवा असल्यास किंवा काही मिनिटांनी हवा असल्यास तेथे रिपीट ऑप्शन सिलेक्ट करू शकतो.

६.त्यानंतर खाली आपले काम कोणत्या प्रकारच्या आहे, ते तेथे आपण सिलेक्ट करू शकतो. उदाहरणार्थ डिफॉल्ट, पर्सनल, शॉपिंग रिलेटेड, विशलिस्ट किंवा वर्क.

७. तसेच आपण आपले वैयक्तिक काम त्यात ॲड करू शकतो.

८.माहिती भरून झाल्यावर वरती उजव्या कोपऱ्यात बरोबर अशी खून दिसेल. त्यावर क्लिक करून आपले काम सेव्ह करावे.

९.आता आपण पुन्हा मुखपृष्टा वरती याल, तेथे आपण नोंद केलेल्या कामाची माहिती आपल्याला दिसेल.

१०.आता ते काम इतर व्यक्तीला शेअर करायचे असल्यास आपण त्या कामावरती  प्रेस करून राहावे, त्यानंतर आपल्याला वरती शेअर ऑप्शन दिसेल. शेअर ऑप्शन च्या मदतीने आपण ते काम व्हाट्सअप किंवा इतर माध्यमाने दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो.

११.त्यानंतर ते काम पुर्ण झाल्यावर त्या कामाच्या लिस्ट च्या अगोदर आपल्याला चौकोन दिसेल त्या चौकोनावर क्लिक करावे. त्यानंतर त्या कामाची लिस्ट आपल्या मुखपृष्टा वरून निघून जाईल.

अशाप्रकारे अत्यंत सोप्या रीतीने आपण आपले दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करू शकतो.


धन्यवाद...

उद्या नवीन ॲप सहित पुन्हा भेटू.

मेसेज आवडला तर नक्की सांगा.

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.
पत्ता :- निर्मला कॉम्पुटर एजुकेशन
तहशील रोड,अशोक सम्राट नगर,
रजिष्टर ऑफिस जवळ,नागभीड.
मोबाईल नं. - ९०२१३२६४४१ उमेश वारजुरकर

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs