Saturday, April 25, 2020

Snapseed

*Snapseed* स्नॅपसीड

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला Snapseed या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
स्नॅपसीड (Photo Edit) करण्याचे ॲप आहे. स्नॅपसीड सर्वात लोकप्रिय फोटो एडिटिंग अॅप्सपैकी एक आहे.

१. प्रथम प्ले स्टोर ला जाऊन हे ॲप डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा

२. ॲप सुरू झाल्यावर आपल्यास प्रथम एक ग्रे कलर ची स्क्रीन येईल ज्यावर आपण एडिट करू इच्छित असलेला फोटो निवडण्यास सूचित केले जाईल.  आपण हवा तो फोटो निवडावा.

३. इच्छित फोटो निवडल्यानंतर संपूर्ण स्क्रीन  नेव्हिगेशन इंटरफेससह दिसेल. 

४. आता स्क्रीन वर दिसणारे सर्व पर्याय वापरून पहा. विविध प्रकारच्या स्टाईल्स आपण फोटो एडिटिंग वापरू शकतो. टूल्स मध्ये तर बरेच पर्याय आहेत ज्याने फोटो एडिट करायला तुम्हाला फार मजा येईल. एखादी आपली स्टेप चुकली तर undo पण करता येत. एकदा का तुमचा फोटो एडिट झाला की तो तुम्ही Save करू शकता किंवा शेअर पण करू शकता.
मी गजाचा एक फोटो एडिट केला आहे जो सोबत पाठवतोय तुम्ही तुमचा फोटो स्नॅपसीड वापरून एडिट करा आणि ग्रुप वर नक्की शेअर करा.

धन्यवाद.

उद्या नवीन ॲप सहित पुन्हा भेटू.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs