Sunday, April 19, 2020

Jitsi Meet जिट्सी मीट कसे वापरावे.


*Jitsi Meet–* *जिट्सी मीट* 

नमस्कार मित्रांनो,

कोरोना या रोगामुळे आपण सर्वजण घरी अडकलेलो आहोत. म्हणून आपण झूम, गूगल मिट यासारख्या ॲपच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतो. कालच मी तुम्हाला गुगल मीट बद्दल माहिती दिली.मित्रांनो इतरांशी भेटणे तसेच बोलण्याची गरज, तसेच महत्त्वाची कामे या आपल्या  गरजेमुळे मी आज आपल्याला एक नवीन ॲप बद्दल माहिती देतोय ते म्हणजे जिट्सी मीट.

जिप्सी मीट हे पूर्णपणे फ्री सॉफ्टवेअर आहे. तसेच यामधून आपण Sign In म्हणजेच आपण लॉगिन न करता सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग घेऊ शकतो. तसेच यामधून आपण व्हिडिओ व मेसेजिंगही करू शकतो. 
आपण मीटिंग साठी 75  युजर्स घेऊ शकतो. 
खूपच सोप्या रीतीने आपण हे ॲप वापरू शकतो.
तर चला पाहूया कशा प्रकारे आपण  जिट्सी मीट या मॅप मधून लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊ शकतो.

१.सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक प्ले स्टोर वरून जिट्सी मीट हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.

२. ॲप इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करावे. ॲप ओपन केल्यावर आपल्याला होम स्क्रीन दिसेल.

३. होम स्क्रीन वर आपल्याला Enter room name  असा ऑप्शन दिसेल. 

४.त्याखाली एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला दिसेल. त्या टॅक्स बॉक्स वर क्लिक करावे व तिथे आपण आपल्या मीटिंगसाठी नाव द्यावे.

५. त्यानंतर तेथे आपल्याला CREATE/JOIN  असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे. 

६.त्यानंतर आपल्या मिटींगला सुरुवात होईल. तसेच आपल्याला तेथे Invite Others बटन दिसेल. 

७.Invite Others बटनावर क्लिक करून आपण शेड्युल केलेल्या मीटिंगची लिंक व्हाट्सअप किंवा इतर माध्यमाने इतरांना पाठवावी. तसेच त्यांना लिंक वर क्लिक करून मीटिंग जॉईन करण्यास सांगावे.

अशाप्रकारे खूपच सोप्या रीतीने व सहज आपण छोट्या  मीटिंग घेऊ शकतो.

धन्यवाद...

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs