Wednesday, April 22, 2020

Free Voot Intertenment App

*Voot* – *वूट* 


नमस्कार मित्रांनो,

आज मी आपल्याला voot या ॲप बद्दल माहिती देणार आहे.
voot हे एक इंडियन ॲप आहे. जे फक्त भारतातील लोकांसाठी तयार करण्यात आले आहे.
 हे ॲप ग्राहकांच्या डिमांड वरून त्यांना विविध कार्यक्रम मोबाईल वरती पाहता यावेत यासाठी वूट  हे ॲप मार्च 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले. या ॲप मधून आपण सर्व न्यूज चैनल, टिव्ही चैनल, लाईव्ह टीव्ही तसेच भारताबाहेरील कार्यक्रम आणि बरच काही पाहू शकतो. तसेच यावर आपण आपले आवडते प्रोग्रॅमही बघू शकतो. या ॲप मधून इंग्लिश, हिंदी, कन्नड, गुजराती, मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलगू या भाषांमधील सर्व टीव्ही प्रोग्रॅम आपण यावर पाहू शकतो.
या ॲप मधून आपण घरबसल्या आपल्याला हव्या त्या वेळेत मनोरंजन कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकतो.

चला तर मग पाहूया कशाप्रकारे आपण या  ॲपचा आनंद घेऊ शकतो.

१. सर्वप्रथम प्ले स्टोर वरून Voot हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.

२. ॲप ओपन केल्यावर आपल्याला तेथे ई-मेल आयडी विचारला जाईल.

३. तसेच त्याखाली Countinue with Facebook व Countinue with Google असे दोन ऑप्शन दिसतील. म्हणजेच आपल्या एक्झीटींग फेसबुक किंवा जीमेल अकाउंट च्या मदतीने आपण देते आपले अकाउंट  तयार करू शकतो.

४. शक्यतो आपल्या सर्वांच्या फोन मध्ये जीमेल अकाउंट हे ऑलरेडी तयार केलेलेच असते. त्यामुळेच आपण Countinue with Google या ऑप्शन वर क्लिक करावे.

५. त्यानंतर आपल्याला आपली बेसिक माहिती विचारली जाईल, ती तिथे भरावी.
e.g. Profile Name,  Date of Birth, Gender आणि language preferences.

६. त्यानंतर खाली सब्मिट या बटनावर क्लिक करावे.

७. आता आपले Voot ॲप वरती अकाउंट ओपनिंग प्रोसेस पूर्ण होईल व आपण होम स्क्रीन वरती याल.

८. आता त्यामध्ये आपण न्यूज चैनल तसेच इतर मनोरंजन चैनल पाहू शकतो.

९. तसेच एखादा आपला आवडीचा प्रोग्रॅम आपण त्यामध्ये डाऊनलोडही करू शकतो. जेणेकरून आपण तो नंतर आपल्या वेळेत पाहू शकतो.

अशाप्रकारे घरबसल्या आपल्या मोबाईल फोन वरती आपण टिव्ही चैनल, न्यूज चैनल, तसेच इतर मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो.


धन्यवाद... 

उद्या नवीन ॲप सहित पुन्हा भेटू

होय आता MS-CIT  आता घरच्या घरी करता येन सोप आहे.

प्रवेश घेण्यासाठी या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




धन्यवाद...

उद्या नवीन ॲप सहित पुन्हा भेटू.

0 Comments:

Post a Comment

Please Comment This Blogs